गोकुळच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; शौमिका महाडिक म्हणाल्या, “सत्ताधारी लोक…

कोल्हापूर | गोकुळच्या 60 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाोरदार गोंधळ आणि तू तू मै मै पहायला मिळाली. ही सभा भांडणामुळे नीट पार पडू शकली नाही. या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पहायला मिळाला.

यावेळी बसण्याकरिता जागा नसल्याने आणि समाधामकारक उत्तरे मिळत नसल्याने शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) सभेतून बाहेर पडल्या आणि त्यांनी समांतर सभा सुरु केली.

यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांनी दिलेली वचने पाळली नाहीत, असा आरोप केला. सभा संपल्यानंतर सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि ऋतुराज पाटील या तिनही आमदारांना सभासदांनी खांद्यावरुन व्यासपीठावर नेले.

गोकुळ समुहाचे अध्यक्ष (Chairman of Gokul) विश्वास पाटील (Vishwas Patil) यांचे अध्यक्षीय भाषण सुरु झाल्यावर विरोधकांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली आणि सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद सुरु झाला.

यानंतर शौमिक महाडिक यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. त्या म्हणाल्या, संचालकांनी आम्हाला साध्या शब्दात उत्तरे द्यावी, अशी आमची मागणी होती. राजकीय प्रश्न विचारले नसता, त्यांना उत्तरे देणे जड जात होते.

तसेच आमच्या डोळ्यांत डोळे घालणे देखील त्यांना जड जात होते. अहवाल वाचत असताना, प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची नजरही उचलत नव्हती. दूध उत्पादक खूप साधा असून, त्याला गुंडाळण्याचा प्रयत्न करु नका.

त्यांना उत्तरे देता येत नाही हे चेअरमन साहेबांनी मान्य करावे, असे महाडिक म्हणाल्या. तसेच चुकीच्या निर्णयावर पडदा टाकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असून एकाही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर आम्हाला मिळाले नसल्याचे महाडिक म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या – 

नोएडातील ट्विन टॉवर पाडण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना मोठा दणका

सत्ताधाऱ्यांना शरद पवारांची संगत का नको? जाणून घ्या कारणे

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल; अमोल मिटकरी यांचे खळबळजनक भाकीत

गणेश भक्तांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांनी दिले नवे आदेश

“आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे!” – मनसेचे संदीप देशपांडे