सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; सोनं-चांदी झालं स्वस्त, वाचा ताजे दर

नवी दिल्ली | बुधवारी सकाळी सोन्याचा फ्युचर्स भाव तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला. लग्नसराईच्या हंगामातही सोन्याचा भाव 50 हजारांच्या आसपास पोहोचला असून, चांदीची विक्री 60 हजारांच्या आसपास होत आहे.

मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर, 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत सकाळी 228 रुपयांनी घसरून 50,358 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.

सोन्याच्या किरकोळ वायदा किमतीची ही तीन महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. आजच्या व्यवहारात सोने 50,445 रुपयांवर खुले होते, परंतु मागणी कमी झाल्याने ते 0.45 टक्क्यांनी घसरून तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आलं.

आज चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली आणि त्याची फ्युचर किंमत 60 हजारांच्या जवळ पोहोचली. सकाळच्या व्यवहारात चांदी 280 रुपयांनी घसरून 60,338 रुपये प्रति किलोवर विकली गेली.

चांदीने आज 60,525 रुपयांच्या पातळीवर व्यवहार सुरू केला, परंतु विक्री वाढल्याने त्याची किंमत लवकरच 0.46 टक्क्यांनी घसरून 60,338 वर आली आहे.

जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. अमेरिकन सराफा बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली.

महत्त्वाच्या बातम्या- 

“सुदैव आहे तुमचं की तुम्हाला तुरूंगात दणके बसले नाहीत, तुम्ही त्यातच खुशी माना” 

मोठी बातमी! नवाब मलिक प्रकरणी एनआयएच्या तपासात अत्यंत धक्कादायक खुलासा 

ह्युंदाईची जबरदस्त इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार, पाहा लूक आणि फिचर्स 

“राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून…” 

“…तर भाजप पुढचे 30 वर्षे सत्तेतून बाहेर जाणार नाही”