दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच सोन्याला उतरती कळा, विचार करणार नाही इतकं स्वस्त!

नवी दिल्ली |  आपल्यातील अनेकांना सोन्याचे दागिने घालण्याची हौस असते. दिवाळी दसरा म्हटलं की भारतीय स्त्रियांची दागिने खरेदी करण्याची घाई असते. सोन्याची वाढत जाणारी मागणी पाहता अलीकडच्या काळात सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत.

दसऱ्यामुळे मागील आठवड्यात सोने खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. दसरा होईपर्यंत सोन्याचे भाव वाढलेलेच होते. मात्र, दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पहायला मिळाली आहे.

सोमवारी एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. सोन्याबरोबरच या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. यामुळे बाजारात नागरिकांची पुन्हा एकदा सोने खरेदी करण्यासाठी घाई दिसू लागली आहे.

आजच्या सुरुवातीच्या व्यापारामध्ये एमसीएक्सवर डिसेंबर डिलिव्हरीसाठी जे सोनं आहे त्याचे दर 0.3 टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे सोन्याचे दर एमसीएक्सवर 50 हजार 679 रुपये झाले आहेत. तसेच चांदीचा दर देखील 1.12 टक्क्यांनी घसरून 61 हजार 479 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

सध्या स्थानिक बाजारात देखील सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. स्थानिक बाजारात प्रती दहा ग्रॅम सोन्यामागे तब्बल 5521 रुपयांची घसरण झाली आहे. मागील सत्रामध्ये सोन्याच्या किंमतीत 0.2 टक्क्यानी वाढ झाली होती. तर चांदीच्या किंमतीत 0.3 टक्क्यांनी वाढ झाली होती.

ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहचले होते. ऑगस्टमध्ये प्रती 10 ग्रॅम सोन्याचा दर 56, 200 रुपये झाला होता. मात्र, आता या महिन्यात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी सराफ बाजारात सोनं स्वस्त झालं होतं. मात्र, चांदीचे दर वाढले होते. शुक्रवारी प्रती 10 ग्रॅम सोन्यामागे 75 रुपयांची घसरण होवून 51,069 रुपये झाली होती. तर चांदीचा दर प्रती किलोमागे 121 रुपयांनी वाढून 62 हजार 933 रुपये प्रती किलो झाला होता.

तसेच गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याचा दर 51,144 रुपयावर थांबला होता. तर चांदीचा भाव 62, 812 रुपये प्रतिकिलो झाला होता. मात्र, आता या आठवड्यात सोन्याच्या किंमती बऱ्याच मोठ्या प्रमाणात खाली उतरल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली माझ्या वडिलांनीच मला…

दसऱ्याच्या मुहूर्तावर दिशा बोलली आणि ‘ती’ चर्चा पुन्हा एकदा रंगली!

भाजपला आणखी मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेचा झेंडा हाती घेणार?

आनंदाची बातमी : सर्व भारतीयांना आता मोफत मिळणार कोरोनाची लस!