अरे वा!!! वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याची झळाळी उतरली, वाचा आजचा दर

नवी दिल्ली | गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. या वर्षात तर सोन्याचे भाव प्रचंड वाढतील, अशी शक्यता अनेक अर्थतज्ञ वर्तवत होते. मात्र, 1 जानेवारीला म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्या चांदीच्या भावात घट झाली आहे.

1 जानेवारीला दिल्ली बाजारात सोन्याच्या किंमतीत 20 रुपयांनी घट होवून सोन्याचे दर 49 हजार 678 रुपये प्रती तोळा इतके झाले होते. 1 तारखेला सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात देखील घट झाली होती. चांदीच्या दरात प्रती किलोमागे 404 रुपयांची घट होवून चांदीचे दर 67 हजार 520 रुपये प्रति किलोग्रॅम इतके झाले होते.

मात्र, एमसीएक्सवर सोन्याचे दरात आज पुन्हा वाढ झालेली पहायला मिळाली आहे. आजचे एमसीएक्सवर सोन्याचे दर 50258 रुपये प्रती तोळा इतके आहेत. तर आज चांदीचा दर 68061 रुपये प्रती किलो इतका आहे. येत्या काळात सोन्या चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असे अनेक अर्थतज्ञ सांगत आहेत.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन वसूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-