संक्रांतीच्या सणादिवशीच सोन्याची झळाळी उतरली, पाहा आजचा सोन्याचा दर

मुंबई | सोन्याच्या वाढत जाणाऱ्या मागणीमुळे अलीकडच्या काळात सोन्याचे भा.व देखील गगनाला भिडले आहेत. मागील काही आठवड्यांत सोन्याचे भा.व उतरले होते. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोणाचे नवे ट्रे.न्स सापडल्यानं सोन्याचे भाव पुन्हा वधारले होते. तसेच मकर संक्रांतीच्या सणामुळे गेल्या काही दिवसात लोकांची सोनं खरेदी करायला झुं.बड उडालेली पाहायला मिळाली होती. यामुळे सोन्याचे भाव सतत वाढत होते.

मात्र, आज मकर संक्रांतीच्या सणादिवशी पुन्हा सोन्याचे भाव उतरले आहेत. आज मुंबईतील सराफा बाजारात सोन्याच्या भावात पुन्हा घ.सरण झाली आहे. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 450 रुपये प्रति तोळा तर 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 48 हजार 450 रुपये प्रति तोळा इतका झाला आहे.

मुंबईतील सराफा बाजारात सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावात देखील घ.ट झाली आहे. मुंबईतील सराफा बाजारात आज चांदीचा भाव प्रती किलोमागे 300 रुपये घसरून 60 हजार रुपये प्रती किलो इतका झाला आहे.

तसेच आज सकाळी एमसीएक्सवर फेब्रुवारी डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 395 रुपयांनी घसरुन 48,910 रुपये इतका झाला आहे. तर मार्च डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव 721 रुपयांनी घसरुन 65,300 रुपये प्रतिकिलो इतका झाला होता.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. आरबीआयने आणलेल्या या ऑफरनुसार चालू आर्थिक वर्षात सॉवरेन गोल्ड बॉ.न्डच्या दहाव्या सिरीजनुसार गुं.तवणूकदार 11 ते 15 जानेवारी दरम्यान गुं.तवणूक करू शकतात.

या ऑफरसाठी 19 जानेवारी ही से.टलमेंटची अं.तिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. आरबीआयने दहाव्या सि.रीजसाठी एक ग्राम सोन्याची किंमत 5 हजार 104 रुपये इतकी निश्चित केली आहे.

त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज करून डिजिटल पे.मेंट करणाऱ्या ग्राहकांना सोन्यामध्ये प्रती ग्रामच्या पाठीमागे 50 रुपयांची सू.ट मिळणार आहे. अशा प्रकारे डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी सोन्याची किंमत 5 हजार 54 रुपये इतकी असेल.

महत्त्वाच्या बातम्या-