10 हजारांनी स्वस्त झालं होतं सोनं; आता पुन्हा एकदा महागलं, जाणून घ्या नवे दर

गेल्या काही दिवस सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु होती. बऱ्याच दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये वाढ झालेली पहायला मिळाली. व्यापारात सकाळी 11.34 वाजता एप्रिलचा सोन्याचा डिलिव्हरी दर 166 रुपयांच्या वाढीसह 48005 प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचल्याचं पाहायला मिळालं. चांदीमध्येही 111 रुपयांची वाढ दिसून आली.

मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळी एप्रिलच्या सोन्याची वायदे किंमत 239.00 रुपयांनी वाढून 48,078.00 रुपयांवर पोहोचली आहे. तर मार्चच्या चांदीची वायदे किंमत 321.00 रुपयांच्या तेजीमुळे 70,405.00 रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या किमतीमध्ये वाढ सुरु आहे. मंगळवारीच्या व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्यामध्ये तेजी जारी आहे. मंगळवारी अमेरिकेमध्ये सोन्याचे दर 12.32 डॉलरने वाढून 1,842.28 डॉलर प्रति औंस झाले होते. तर चांदीचे दर 0.28 डॉलरने वाढून 27.54 डॉलर या स्तरावर पोहोचले आहेत.

Prithvi Finmart चे डायरेक्टर मनोज जैन यांच्या मते, सोन्याचांदीच्या दरात अशाप्रकार चढउतार चालूच राहणार आहे. मनीकंट्रोलशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर 1858 डॉलर आणि चांदीचे दर 28.55 डॉलर या स्तरावर पोहोचू शकतात.

यापूर्वी मागील आठवड्यात सलग पाच दिवस सोन्याची किमतीत घसरण नोंदविण्यात आली होती. सोमवारीच्या व्यापार सत्रात दिल्लीच्या सराफा बाजारात सोने-चांदी या दोन्ही वस्तूंच्या किमती नोंदवल्या गेल्यात. सोन्याचे भाव 94 रुपयांनी वाढून 46,877 रुपयांवर पोहोचले. तर चांदीच्या किमती 340 रुपयांची वाढ पहायला मिळाली.

महत्वाच्या बातम्या –

जनधन खातं असेल तर ‘हे’ काम करा नाहीतर 2 लाख 30 हजार रुपये मिळणार नाही

आता तर हद्दच झाली! ग्रामस्थांनी केली सोनू सूदकडे ‘ही’ अनोखी मागणी

दररोज लवंग खाण्यानं होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

काँग्रेस नेत्यानं गर्लफ्रेंडला दिलेल्या ‘या’ अनोख्या गिफ्टची सगळीकडं चर्चा; वाचा काय आहे हे गिफ्ट

अंकिता लोखंडे म्हणते ‘धकधक करने लगा’, पाहा नेमकं काय झालंय!