सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, वाचा काय आहेत आजचे दर

नवी दिल्ली| भारतातील लोकांला सोन्याच्या असलेल्या चाहतीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो. सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कल आहे, त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं.

गेल्या काही दिवसांपासून सोने तसेच चांदीच्या भावात सातत्याने मोठे चढ-उतार पहायला मिळत आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांक गाठला होता. 56 हजार 200 रुपये प्रति तोळा झालेल्या सोन्याच्या किमती तब्बल 13000 रुपयांनी स्वस्त होऊन 43 हजार रुपयांपर्यंत खाली आल्या होत्या. परंतु आता या किमतींमध्ये हळूहळू परत एकदा वाढ होत असताना पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे, तर चांदीच्या दरात मात्र घट नोंदवली गेली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा जूनचा वायदा 116 रुपयांनी म्हणजेच 0.24 टक्क्यांनी वाढून 47469 प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. तर, चांदी 0.46 घसरुन 68,367 रुपये प्रतिकिलोवर आली आहे.

मात्र, अजूनही सोनं आपल्या उच्चांकापेक्षा 9085 प्रति दहा ग्रॅम स्वस्तच आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहाता सोन्याचे भाव पुन्हा मागील वर्षीप्रमाणे उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मार्केट तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोन्याच्या किमती लवकरच पुन्हा एकदा 50 हजाराच्या लेवलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रसार वाढल्यानं आर्थिक अनिश्चिततेमुळे बॉन्ड यिल्डमध्ये घसरण, डॉलरच्या किमतीत घट आणि सोन्याच्या जागतिक मागणीत तेजी पाहायला मिळू शकते.

आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव 50430 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहेत. तर, मुंबईमध्ये 46020, चेन्नईमध्ये 48580, कोलकातामध्ये 49020 प्रति दहा ग्रॅम अशा किमती आहेत.

गेल्या काही आठवड्यांमध्ये सोने-चांदीचे दर खूप खाली उतरले होते. मात्र, येत्या काही दिवसांत सोने-चांदीचे दर वाढतील असे अनेक अभ्यासक बोलत आहेत. यामुळे सोने-चांदी खरेदी करण्याची हीच संधी मानली जात आहे.

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांश वेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो.

महत्वाच्या बातम्या – 

‘दिग्दर्शकानं मला….’. ‘या’…

सायली संजीवचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर…

‘मुंबईत लोकांचा मृत्यू होतोय आणि इथे आयपीएल खेळवली…

जाणून घ्या! कोरोना काळात ‘या’ पदार्थांचे सेवन…

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा…