नवी दिल्ली | कोणताही सन म्हटलं की सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोनं-चांदीला प्राधान्य देत असतात. भारतात सोन्या-चांदीची वाढती मागणी पाहता गेल्या काही वर्षांमध्ये सोन्या-चांदीच्या भावात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे.
सध्या लग्नसराई चालू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठी घट पाहायला मिळाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हे दर वाढू लागले आहेत. लग्नसराई सुरु असल्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे सोन्या चांदीचे दर देखील वाढू लागले आहेत.
31 मार्च रोजी एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याची किंमत 44 हजार 910 रुपये प्रती तोळा होती. हाच दर आज 46 हजार 152 रुपये प्रती तोळा आहे. म्हणजेच एप्रिल महिन्यात सोन्याचा दर 1962 रुपयांनी वाढला आहे. अभ्यासकांच्या मते हा दर 50 हजारापार जाण्याची शक्यता आहे.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात देखील वाढ पाहायला मिळत आहे. 31 मार्च रोजी चांदीची किंमत 62 हजार 862 रुपये प्रति किलो होती. जी आज 66 हजार 905 रुपये प्रति किलो आहे. चांदीच्या दरात देखील एप्रिल महिन्यांत 4043 रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान, मोदी सरकार सोन्याच्या बाबतीत लवकरंच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकंच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.
संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.
अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.
देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.
महत्वाच्या बातम्या-
अरे वाह! या’ स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कुटर विषयी तुम्हाला माहीत आहे का? नक्की वाचा
मध्य प्रदेश पोलिसांची गुं.डागिरी! रिक्षा चालकाला भर चौकात मारला; व्हिडीओ व्हायरल
पुढील चार दिवस ‘या’ भागात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा, वाचा सविस्तर
‘मिसेस श्रीलंका’च्या मंचावर राडा! विजेतीचा मुकूट…
‘वय विचारू नका, थोडी लाज वाटते’ म्हणत…