लवकरंच मिळणार गोड बातमी! पेट्रोल 45 रुपये लीटरवर येणार तर डिझेल देखील कमी होणार?

नवी दिल्ली | अलिकडे काही वर्षांमध्ये पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे वाहन चालवणे सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. सोशल मिडीयावर देखील वाढत्या दरांवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

अनेक राज्यांमध्ये तर पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. पेट्रोलच्या पाठीमागे डिझेलचा दर देखील शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. कोरोनामुळे अगोदरच सामान्य नागरिकांचं आर्थिक बजेट कोलमडलं आहे. यात पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने नागरिक चांगलेच संतापले आहेत.

हेच ओळखून आता पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अर्थमंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालयाने काही राज्यांशी संवाद साधला आहे. इंधनाचे दर कमी झाले पाहिजेत. मात्र, त्याचा महसुलामध्ये देखील जास्त फरक पडायला नको, अशा पद्धतीने काही करता यावे यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे.

येत्या काही दिवसांत देशातील 4 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणूका आहेत. पेट्रोलच्या दराचा या निवडणुकीवर परिणाम होवू नये म्हणून भाजप सरकार प्रयत्न करत असल्याचं समजत आहे.

गेल्या वर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निचांकी पातळीवर पोहचल्या होत्या. मात्र, तरीही मोदी सरकारने त्यावरील कर वाढवला होता. आता दर कमी झालेले आहेत तरी देखील मोदी सरकार इंधनाचे दर कमी करत नाही.

पेट्रोलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 60 टक्के कर आकारला जातो. सरकारने हा कर कमी करण्याचा निर्णय घेतला तर पेट्रोल जवळपास 45 रुपये प्रती लिटर पर्यंत येवू शकतं. तसेच डिझेलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 54 टक्के कर आकारला जातो. हा कर सरकारने कमी केल्यास डिझेलचे दर देखील खाली येवू शकतात.

दरम्यान, पेट्रोल डिझेलचे वाढते दर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्याचे केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराचे खापर पूर्वीच्या सरकारवर फोडत आहे. इंधनाच्या वाढत्या भावावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. मात्र, सामान्य नागरीकच यामध्ये चेपला जात आहे.

पेट्रोल दरवाढ हा एक राष्ट्रीय प्रश्नच बनला आहे. पेट्रोल दरवाढीवरुन नेटकरी नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. तसेच देशभरातून इंधनाचे दर कमी व्हावेत, अशी मागणी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

अबब…सोन्याच्या दरात फार मोठी घसरण; वाचा आजचे दर

धक्कादायक! भाजपच्या ‘या’ मंत्र्याच्या से.क्स सीडीतील आणखी एक व्हिडीओ व्हायरल

पोलिसांना विनाकारण वाहन अडवण्याचा नाही अधिकार, असे घडल्यास ‘या’ क्रमांकावर दाखल करा तक्रार

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी आढळतंय चक्क विहीरींमध्ये पेट्रोल, अनेक विहीरी पेट्रोलने गच्च! पाहा व्हिडीओ

‘माझ्या स्तनांची सर्जरी करण्यास सांगितलं अन्…’; दिपिकाचा धक्कादायक गाैप्यस्फोट!