मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आजचे दर

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीत सतत चढउतार पहायला मिऴत आहे. अलिकडे अमेरिकन इक्विटी बाजारात बिटकॉइनच्या किंमती वाढल्यामुळे सोन्या-चांदीमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. यामुऴे सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आता ही एक चांगली संधी मानली जात आहे.

एमसीएक्सवर सध्या सोन्याचे दर 44 हजार 510 रुपये प्रती तोळा आहेत. काल एमसीएक्सवर सोन्याचे दर 44 हजार ४३० रुपये प्रती तोळा होते. याच दरात आज 80 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याबरोबरंच आज चांदीच्या दरात देखील वाढ पहायला मिळाली आहे. आज चांदीच्या दरात प्रती किलोमागे 280 रुपयांची वाढ झाली आहे. आज एमसीएक्सवर चांदीचे दर 65 हजार 700 रुपये प्रती किलो आहेत.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याच्या बाबतीत लवकरंच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जाऊ तशी सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

पूजा चव्हाण प्रकरणात नवीन ट्वीस्ट! ‘या’ कारणाने भाजप नगरसेवकाला पुणे पोलिसांची नोटीस

दिग्दर्शक अभिषेक कपूर सुशांतच्या आठवणीत व्याकूळ, व्हिडिओ शेअर करत म्हणाले…

“मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का?”

जाणून घ्या! बीट खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

आयकर विभागाच्या छापेमारीनंतर तापसी पन्नूची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली….