सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.

बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. मात्र आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.

सोमवार म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 760 रूपये होता. तर आच त्यामध्ये 10 रूपयाची वाढ झाली असून, आज 26 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 47 हजार 770 रूपये झाला आहे.

तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 66 हजार रूपये होता. आज चांदीच्या किंमतीमध्ये 400 रूपयांची घट झाली असून, आज प्रती किलो चांदीचा दर 65 हजार 600 रूपये इतका झाला आहे.

तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 49 हजार 310 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 65 हजार 600 इतका आहे.

महत्वाच्या बातम्या-

येत्या महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का?; जयंत पाटलांच मोठं वक्तव्य म्हणाले…

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये मोठा बदल, वाचा आजचा दर

मलिकजी माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका- समीर वानखेडे

मागासवर्गीय असल्यानेच समीर वानखेडेंना टार्गेट केलं जातंय- रामदास आठवले

“बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील”