सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; पाहा काय आहे भाव…

नवी दिल्ली | अलिकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मा.गणी प्र.चंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणं हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत.

अलीकडे सोनं 46 हजार रुपये प्रती तोळ्याच्या आसपास राहत आहेत. राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात 358 रुपयांची घसरण झाली आहे. आता सोन्याचे नवीन दर 45 हजार 959 रुपये प्रती तोळा झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबद्दल माहिती दिली आहे.

गुरुवारी सोन्याच्या दरात घट झाली असली तर चांदीच्या दरात मात्र वाढ पहायला मिळाली आहे. गुरुवारी चांदीच्या दरात 151 रुपयांची वाढ झाली आहे. आता चांदीचा भाव 69 हजार 159 रुपये प्रती किलो आहे.

मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली होती. तसेच येत्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या किंमती आणखी खाली येऊ शकतात. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची किंमत 42 हजार प्रति दहा ग्रॅम रुपयांपर्यंत घसरू शकते, असे अनेक अर्थतज्ञ बोलत आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घोषित करताच सोन्याच्या दरात मोठी घट पहायला मिळाली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्या चांदीच्या दरात सतत चढउतार पहायला मिळत आहे. अलिकडे आंतराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलरच्या तुलनेेत रुपयांचा भाव कमी होताना दिसत आहे.

तसेच कोरोनावरील लसींच्या बातम्यांमुळे सोन्या चांदीच्या दरावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंतवणूकदार देखील सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळत आहेत. यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

चिंताजनक! कोरोनामुळे शरिराच्या ‘या’ अवयवावर होतोय गंभीर परिणाम

आज भारत बंदची हाक, कसं असेल स्वरुप? वाचा सविस्तर

वृत्तवाहिनीच्या लाईव्ह चर्चेत ‘या’ भाजप नेत्याला चपलेनं मा.रलं! पाहा व्हिडीओ

1 मार्चपासून शाळा बंद? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश