आज सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा आजचे दर

नवी दिल्ली |  अलिकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मा.गणी प्र.चंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणं हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत.

आज एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 10 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज प्रति तोळा सोन्याचा दर 44 हजार 520 रुपये इतका आहे. काल सोन्याच्या दरात 180 रुपयांची घसरण झाली असून, सोन्याचा दर 44 हजार 530 रुपये होता.

तसेच एमसीएक्सवर चांदी 700 रुपयांनी घसरली असून, चांदीचा आजचा दर प्रति किलो 66 हजार 900 रुपये आहे. काल चांदीच्या दरात 200 रुयांची वाढ झालेली पाहायला मिळालेली. त्यामुळे चांदीचा प्रति किलो 67 हजार 900 रुपये इतका होता.

मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली होती. तसेच येत्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या किंमती आणखी खाली येऊ शकतात. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची किंमत 42 हजार प्रति दहा ग्रॅम रुपयांपर्यंत घसरू शकते, असे अनेक अर्थतज्ञ बोलत आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घोषित करताच सोन्याच्या दरात मोठी घट पहायला मिळाली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्या चांदीच्या दरात सतत चढउतार पहायला मिळत आहे. अलिकडे आंतराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांचा भाव कमी होताना दिसत आहे.

तसेच कोरोनावरील लसींच्या बातम्यांमुळे सोन्या चांदीच्या दरावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंतवणूकदार देखील सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळत आहेत. यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.
महत्वाच्या बातम्या-

छे.डछाड करणाऱ्या रोड रोमियोला विद्यार्थिनीने भररस्त्यात मा.रलं, पाहा व्हिडिओ

“विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा, तेल स्वस्त झालंय का?”

उन्हाळ्यात दही खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

खुशखबर! आता सोनं झालंं आणखी स्वस्त; वाचा आजचे दर

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! वाचा पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाले?