Top news देश

सलग चार दिवसाच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या किंमतीत क्षुल्लक वाढ; वाचा आजचे दर

नवी दिल्ली | अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मा.गणी प्र.चंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणे हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. अलीकडे सोनं 50 हजार रुपये प्रती तोळ्याच्या आसपास राहत आहे.

गेल्या चार दिवसांपासून एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याच्या दरात सलग घ.ट पहायला मिळाली होती. सलग चार दिवसाच्या घस.रणीनंतर आज एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याच्या दरात क्षुल्लक वाढ पहायला मिळाली आहे.

आज एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याच्या प्रती तोळ्यामागे केवळ 10 रुपयांची वाढ पहायला मिळाली आहे. आज एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याचे दर 49 हजार 330 रुपये प्रती तोळा इतके झाले आहेत. तर मंगळवारी हेच दर 49 हजार 320 रुपये प्रती तोळा इतके होते.

सोन्याच्या किंमतीत क्षुल्लक वा.ढ झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र आज एमसीएक्सवर घट पहायला मिळाली आहे. आज चांदीच्या दरात प्रती किलोमागे 200 रुपयांची घ,ट होवून चांदी 66 हजार 500 रुपये प्रती किलो इतकी झाली आहे.

सोमवारी आणि मंगळवारी एमसीएक्सवर चांदीचे दर स्थिरावल्याचं पहायला मिळालं होतं. एमसीएक्सवर गेले दोन दिवस चांदीचे दर 66 हजार 700 रुपये प्रती किलो इतके होते.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्या’ महिलेने ब.लात्काराचा आ.रोप मागे घेतल्यानंतर मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘स्वतःला सिद्ध केल्याचं समाधान लाभले’; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या यशानंतर रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया

‘शिवेंद्रराजेंसह ‘हे’ नेते राष्ट्रवादीत पुन्हा येणार’; नवाब मलिक यांचं मोठं वक्तव्य!

पैशांच्या मोबदल्यात देतात पाहिजे ते सुख; पाश्चात्य देशांत वाढतोय शुगर रिलेशनचा ट्रेंड

मारुती सुझुकीच्या ‘या’ गाडीची लोकप्रियता शिखरावर; 23 लाख गाड्यांच्या विक्रीनं खळबळ!