नवी दिल्ली | नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येत आहे. अनेक अर्थांनी गेलेलं वर्ष 2021 महत्त्वाचं होतं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं बाजारात म्हणावी अशी तेज पहायला मिळाली नव्हती.
2020 मध्ये सोनं हे प्रचंड मोठ्या तेजीत पहायला मिळालं होतं. पण 2021 यावर्षात सोन्यानं तशी कामगिरी केली नाही. बाजारावरदेखील याचा प्रभाव दिसत होता.
नवीन वर्षात मात्र सोन्याचा दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचा काळ आणखीनही संपलेला नाही. सध्या अचानकपणे कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या महागाईमुळं सोन्याचा दर 55 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिणामी सोनं आता आहे त्यापेक्षा जास्त उंचीवर जाणार आहे.
2020 वर्षी सोनं आतपर्यंतच्या सर्वोच्च उंच्चांकावर पोहोचलं होतं. पहिल्या लाटेदरम्यान सोनं ही एकमेव गोष्ट होती ती तेजीत होती. सोन्याचा भाव तेव्हा 56 हजार 200 रूपये प्रतितोळा पोहोचला होता.
वर्ष 2020 च्या सरतेशेवटी सोन्याच्या दरामध्ये घसरण पहायला मिळली होती. शेवटच्या तिमाहीत होती. त्यानंतर 2021 वर्षाच्या शेवटी सोनं 46,874 रूपये प्रतितोळा इतक्या उंचीवर होते.
गेल्यावर्षीच्या सोन्याच्या कामगिरीवर जगभरातील अनेक तज्ज्ञांनी अभ्यास केला आहे. परिणामी या अभ्यासानूसार या नवीन वर्षात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 2022 मध्ये पहिल्या सहामाहित सोन्याचा भाव 45 ते 50 हजारांच्या मध्ये असण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या सहामाहित तो 55 हजारांवर जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
“नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवण्याचा संकल्प केलाय”
WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…
“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”
“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”
‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती