सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, पाहा काय आहेत आजचे दर

नवी दिल्ली | अलिकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मा.गणी प्र.चंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणं हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देताना दिसतात.

आज सोन्याच्या भावात 10 रुपयानी वाढ झालेली पाहायला मिळतं आहे. त्यांंमुळे प्रति ग्रॅम सोन्याचा भाव 45 हजार 950 रुपये झाला आहे. 1 मार्च रोजी सोन्याच्या भावातही 10 रुपयानी वाढ झाली असल्यामुळे कालचा सोन्याचा भाव 45 हजार 940 रुपये इतका होता.

चांदीच्या भावात 1 हजार 210 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रति किलो चांदीचा आजचा भाव 66 हजार 300 रुपये इतका झाला आहे. काल चांदीच्या भावात 10 रुपयांनी वाढ झाल्याने प्रति किलो चांदीचा भाव 67 हजार 510 रुपये इतका होता.

मागील काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दर वाढत होते. सोने 47 हजारांच्या पुढे होते. मात्र, मागील 15 दिवसांपासून सोने चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याचे दर 45 हजाराच्या पुढे गेले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घोषित करताच सोन्याच्या दरात मोठी घट पहायला मिळाली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्या चांदीच्या दरात सतत चढउतार पहायला मिळत आहे. अलिकडे आंतराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलरच्या तुलनेेत रुपयांचा भाव कमी होताना दिसत आहे.

तसेच कोरोनावरील लसींच्या बातम्यांमुळे सोन्या चांदीच्या दरावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंतवणूकदार देखील सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळत आहेत. यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

महत्वाच्या बातम्या-\

आमदाराच्या घोरण्यामुळे विधानसभेची शांतता झाली भंग अनं…

जाणून घ्या! शरीराला मजबूत बनवणाऱ्या आवळ्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

गॅस सिलेंडरच्या दराचा भ.डका! गेल्या 30 दिवसांत चाैथी वाढ, पाहा किती रुपयांनी महागला?

राठोडांनंतर आता धनंजय मुंडे देखील राजीनामा देणार? पंकजा मुंडे म्हणाल्या…

पुण्यातील ‘या’ ठिकाणी फुकट वडापाव खालल्याने गजा मारणेवर गु.न्हा दाखल