आज सोन्याच्या दरात इतक्या’ रुपयांची वाढ, पाहा काय आहेत दर

नवी दिल्ली | अलिकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मा.गणी प्र.चंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणं हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत

आज सोन्याच्या दरात 10 रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजचा सोन्याचा दर प्रति ग्रॅम 44 हजार 530 रुपये झाला आहे. काल म्हणजेच 7 मार्च रोजी सोन्याचा प्रति ग्रॅम दर 44 हजार 520 रुपये होता.

चांदीच्या आजच्या दरात 800 रुपयांनी वाढ झाली असल्यामुळे आजचा प्रति किलो चांदीचा दर 66 हजार 500 रुपये आहे. चांदीचा कालचा प्रति किलो दर 65 हजार 700 रुपये होता.

मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली होती. तसेच येत्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या किंमती आणखी खाली येऊ शकतात. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची किंमत 42 हजार प्रति दहा ग्रॅम रुपयांपर्यंत घसरू शकते, असे अनेक अर्थतज्ञ बोलत आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घोषित करताच सोन्याच्या दरात मोठी घट पहायला मिळाली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्या चांदीच्या दरात सतत चढउतार पहायला मिळत आहे. अलिकडे आंतराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांचा भाव कमी होताना दिसत आहे.

तसेच कोरोनावरील लसींच्या बातम्यांमुळे सोन्या चांदीच्या दरावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंतवणूकदार देखील सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळत आहेत. यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

रोज गुळ खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

“राज ठाकरेंच्या आवाहनामुळे राज्यातील कोरोना वाढला आहे”

ऑनलाईन सत्रादरम्यान वकिलाने जे केलं ते पाहून सॉलिसिटर जनरल म्हणाले आम्हालाही…

सर्वसामान्यांंना दिलासा देणारी बातमी! पाहा पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाले?

गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं ‘हे’ आव्हान