Gold Rate | सोने-चांदीच्या दरात वाढ, वाचा ताजे दर

मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) चढउतार होताना दिसत आहेत. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर दिसला.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव वाढलेले होते. अशातच आज शुक्रवारी भाव वाढ कायम असलेली पहायला मिळाली.

सोनं आज पुन्हा एकदा 51000 रुपयांजवळ पोहोचलं आहे. तर चांदीचा भाव 62 हजारांवर आहे.

सोने दरात मागील किमतीच्या तुलनेत 0.12 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरात 0.54 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली.

भारतात उत्तम गुतंवणूक म्हणून सोनं खरेदीवर भर दिला जात असतो. त्यामुळे भारतीयांचा सोनं खरेदी करण्याकडे मोठा कल आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो.

काही दिवसांपासून सोने-चांदी दरांमध्ये चढउतार पहायला मिळत आहे. या आठवड्यातही सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

सोनं म्हटलं की भारतीयांसाठी जीव की प्राण असतो. एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या –

  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट आली समोर!

  “स्वाभिनाने जगणारा संभाजी छत्रपती आहे, कोणासमोर झुकून मी खासदारकी घेणार नाही”

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरेंनी सांगावं की मी…” 

सेक्स वर्क हा एक व्यवसाय, त्यांनाही सन्मानाची वागणूक द्या- सर्वोच्च न्यायालय 

शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका!