मुंबई | काही दिवसांवर गुढीपाडवा आला आहे. नवीन वर्षाच्या मुहुर्तावर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) चढउतार होताना दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आता भारतीय बाजारावर देखील होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी पडझड पहायला मिळतेय.
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीही महाग झाली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (21 ते 25 मार्च) 24 कॅरेट सोन्याचा दर 51,464 होता, जो शुक्रवारपर्यंत 51,892 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 67,687 रुपयांवरून 68,691 रुपये प्रति किलो झाली आहे. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.
सोनं हा भारतीयांसाठी जिव्हळ्याचा विषय आहे. एक उत्तम गुंतवणुक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे भारतात सोन्यावर विशेष प्रेम असलेलं पहायला मिळतं.
गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. अशातच आता सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत.
दरम्यान, रशिया युक्रेन वादामुळे आता येत्या काही दिवसात सोनं आणि चांदीच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्याच्या दिशेने पावलं टाकताना पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शरद पवारांच्या नातवाचा ‘या’ अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल, पाहा फोटो
‘सेनेचं मानसिक संतुलन बिघडलंय’; चित्रा वाघ भडकल्या
‘आमदारांना मोफत घर मिळणार नाही’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
“…तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार चालणार”
‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन Omicron BA.2, वेळीच व्हा सावध!