Gold Silver Rate: सोनं पुन्हा 50 हजाराच्या पार, चांदीचे दर देखील गगनाला भिडले

मुंबई | नवीन वर्षाच्या मुहुर्तावर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) चढउतार होताना दिसत होतं. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोनं चांदीच्या किंमतीवर होतोय.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आता भारतीय बाजारावर देखील होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी पडझड पहायला मिळत होती. त्यानंतर सोन्याच्या किंमतीने आभाळ गाठलं आहे.

आज सोन्या चांदीच्या दरात 77 रूपयांची वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार 2021 मध्ये सोन्याच्या दरात 3.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा 50,037 रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीच्या दरामध्ये देखील 379 रूपयांची घट झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 63,869 वर पोहोचले आहेत. त्यामुळे आता अनेक लोकं सोनं चांदी खरेदी करताना दिसत नाहीत.

सोनं हा भारतीयांसाठी जिव्हळ्याचा विषय आहे. एक उत्तम गुंतवणुक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे भारतात सोन्यावर विशेष प्रेम असलेलं पहायला मिळतं.

गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. अशातच आता सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत.

दरम्यान, रशिया युक्रेन वादामुळे आता येत्या काही दिवसात सोनं आणि चांदीच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्याच्या दिशेने पावलं टाकताना पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

…तर मुंबई महापालिका पाडू शकते नारायण राणेंचं घर; वाचा काय सांगतो नियम

“आता कुठं पळणार? मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार”; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

Google वर कधीही ‘काॅल गर्ल’ सर्च करू नका, तुमच्यासोबतही घडू शकतो धक्कादायक प्रकार

फरहान-शिबानीच्या हळदीची एकच चर्चा, रिया चक्रवर्तीचा डान्स तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

“किरीट सोमय्यांना वाॅचमनची नोकरी द्या, नाहीतर माळ्याची नोकरी द्या…”