Top news देश

Gold Silver Rate: सोनं-चांदी पुन्हा महागलं; जाणून घ्या आजचे ताजे दर

gold 1 e1614317023760
Photo Credit - facebook Malabar Gold and Diamonds

मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) चढउतार होताना दिसत होतं. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर दिसला.

गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीचे भाव वाढलेले होते. आज शुक्रवारी कमॉडिटी बाजारात मोठी घट पहायला मिळालं आहे. त्यामुळे आता भारतीय सोनं चांदीच्या बाजारावर मोठा परिणाम होताना दिसत आहे.

एमसीएक्सवर आज मंगळवारी सोन्याचा भावामध्ये 9 रुपयांच्या किरकोळ वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 51,568 रुपये इतका आहे.

चांदीच्या भावामध्ये आज जवळपास 224 रुपयांनी वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 66,139 रुपये झाला आहे.

गेल्या काही आठवड्यात जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 1,900 डॉलर प्रति औंस वाढला आहे. तसेच, स्पॉट गोल्डचा भाव 1886.63 डॉलर प्रती औंस झाला आहे.

दरम्यान, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोनं चांदीच्या किंमतीवर होताना दिसत आहे. तर आंतराष्ट्रीय बाजारात देखील चढ उतार होताना दिसतोय. त्यामुळे येत्या काळात सोनं स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“गजा मारणेचंही स्वागत झालं होतं, मग तो काही आदर्श पुरूष आहे का?”

“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??, कारवाई झाली की बोंबलायचं अन्…”

ढोल ताशाच्या गजरात संजय राऊतांचं मुंबईत जंगी स्वागत, म्हणाले…

नितेश राणेंच्या अडचणी वाढणार?; पोलिसांनी मोठं पाऊल उचललं

 “गेल्या 27 वर्षांपासून मी…”, पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे भावूक