Gold Silver Rate: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) चढउतार होताना दिसत होतं. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर दिसला.

गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीचे भाव वाढलेले होते. आज शुक्रवारी कमॉडिटी बाजारात मोठी घट पहायला मिळालं आहे. त्यामुळे आता भारतीय सोनं चांदीच्या बाजारावर मोठा परिणाम होताना दिसत आहे.

एमसीएक्सवर आज मंगळवारी सोन्याचा भावामध्ये 0.40 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 51,953 रुपये इतका आहे.

चांदीच्या भावामध्ये आज जवळपास 0.40 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 67,217 रुपये झाला आहे.

गेल्या काही आठवड्यात जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 1,900 डॉलर प्रति औंस वाढला आहे. तसेच, स्पॉट गोल्डचा भाव 1886.63 डॉलर प्रती औंस झाला आहे.

दरम्यान, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोनं चांदीच्या किंमतीवर होताना दिसत आहे. तर आंतराष्ट्रीय बाजारात देखील चढ उतार होताना दिसतोय. त्यामुळे येत्या काळात सोनं स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मी पुन्हा येईन म्हणणंही एप्रिल फूलच”

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

“शिवसेना-राष्ट्रवादीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता”

Sharad Pawar: शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मुख्यमंत्री ठाकरे गृहखात्यावर नाराज?, दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टचं सांगितलं…