पुणे | पुणे-नगर रोडवरील लोणीकंद येथे सचिन नाना शिंदे या गोल्डनमॅन तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगाराची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे नगर रोडवर एकच खळबळ उडाली होती.
सचिन शिंदे खूप प्रकरणातील आरोपी इतके दिवस तुरूंगात होते. त्यातील एक आरोपी तुरूंगातून सुटून बाहेर आल्यानंतर पाच ते सहा जणांनी आरोपीला मारहाण करत त्याची हत्या केली आहे.
लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या वडिलांवरील हल्लेखोरांनी वार केले. यामध्ये त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला.
प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 22) आणि कुमार शिंदे (वय 55) अशी खून झालेल्या बाप लेकाची नावे आहेत.
लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मराठी शाळे पासून शिंदे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मागील वर्षी गोळ्या झाडून सचिन शिंदेचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सनी शिंदे सह तिघांना अटक केली होती.
तीन महिन्यांपूर्वी जामीन मिळाल्याने सनी शिंदे हा तुरुंगातून बाहेर आला होता. बुधवारी सायंकाळी तो वडिलांसह लोणीकंद परिसरातून चारचाकी गाडीने जात असताना पाच ते सहा जणांनी त्यांना अडवले. त्यानंतर दगड, कोयता आणि बेसबॉलच्या स्टिकने मारहाण केल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या-
उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ, भाजपला सलग सातवा झटका
भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना
“पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची किती बोलतो किती, हा विचारही राऊतांनी करावा”
राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी