धक्कादायक! लेकीच्या न्यायासाठी उपोषणाला बसलेल्या बापाचा मृत्यू; प्रशासन झोपेत

धुळे |  सरकार दरबारी आपल्या मागण्यांसाठी अनेकदा उपोषणास बसणाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून सकारात्मकता दाखवली जात नाही. अशी अनेक उदाहरण आपण सातत्यानं पाहात असतो.

शेती प्रश्न, वीज प्रश्न, महिलांचा प्रश्न, ऊस उत्पादक शेतकरी, पगाराचा प्रश्न अशा एक ना अनेक मागण्यांसाठी उपोषण करण्यात येतात. कधी कधी उपोषणकर्त्यांना आपला जीव देखील गमवावा लागतो.

मुलीला न्याय मिळावा यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालायाच्या आवारात उपोषणास बसलेल्या 70 वर्षीय आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आजी-आजोबा दोघांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी 14 मार्चपासून उपोषणास सुरूवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत सरकारी अधिकारी प्रतिसाद देत नाहीत, अशी तक्रार आहे.

उपोषणस्थळी प्रकृती बिघडल्यानंतर आजोबांचा मृत्यू झाला आहे. तर आजींची तब्येत गंभीर आहे. परिणामी धुळे जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरण्यात येत आहे.

सुधन्वा भदाणे आणि रंजना भदाणे असं या पती-पत्नीचं नाव आहे. मुलीला तिच्या पतीनं सोडून दिल्यानं मुलीच्या न्यायासाठी हे जिल्हाधिकारी कार्यालायाच्या आवारात उपोषण करत होते.

न्याय मिळेपर्यंत आम्ही सुधन्वा यांचा मृतदेह स्विकारणार नसल्याचा आक्रमक पवित्रा सध्या भदाणे यांच्या कुटुंबीयांनी स्विकारला आहे.

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील या घटनेनं सध्या राज्यभरात प्रशासनाच्या गलथान कारभारावर नाराजी वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 सलमान खानला होता ‘हा’ गंभीर आजार; स्वत: भाईजानने केला धक्कादायक खुलासा

 The Kashmir Files: “मी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“वाकणार नाही, मोडणारही नाही, आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही”

“जनाब संजय राऊत…तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच”