आनंदाची बातमी : सर्व भारतीयांना आता मोफत मिळणार कोरोनाची लस!

भुवनेश्वर | गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोनानं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोना महामा.रीमुळे लोकांचं आयुष्य जणू एकाच जागी ठप्प झालं आहे. सध्या सर्वांचंच लक्ष कोरोना लसीवर लागून आहे. अनेक शास्त्रज्ञ सध्या कोरोनाची लस शोधत आहेत.

अशातच आता बिहार विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं बिहार मधील जनतेला कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. यानंतर भाजपनं निवडणूक जिंकण्यासाठी दिलेल्या या आश्वासनाचा देशभरातून विरोध होऊ लागला होता.

फक्त बिहार मधील नागरिकांनाच नाही तर संपूर्ण देशातील जनतेला कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली होती. या मागणीला आता केंद्र सरकारनं सकारात्मकता दर्शवली आहे. देशातील सर्व  नागरिकांना कोरोनाची मोफत लस दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी दिली आहे.

ओडीसाचे अन्न पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री आर. पी. स्वॅन यांनी फ्री वॅक्सीनची मागणी केली होती. स्वॅन यांनी कोरोनावरील लसीबद्दल केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रताप सारंगी यांना प्रश्न विचारले होते.

बिहारमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनावरील लस बिहारमध्ये मोफत दिली जाईल, अशी घोषणा भाजपने केल्यानं स्वॅन यांनी दोघांना घेरले होते. स्वॅन यांनी ट्वीट करत दोन्ही नेत्यांना प्रश्न विचारले होते.

यानंतर प्रताप सारंगी यांच्याकडून स्वॅन यांनी विचारलेल्या प्रश्नांवर सारवासारव करण्यात आली होती. मात्र, आता सर्व भारतीयांना कोरोनावरील लस मोफत मिळेल अशी घोषणा केंद्र सरकारनं केली आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोनावरील लसीवरून यापूर्वी भाजपवर निशाणा साधला होता. तुमच्या राज्यातील निवडणुका पाहून तुम्हाला लस मिळेल, असं गांधी यांनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांनी यासंबंधित एक ट्वीट केलं होतं.

भारत सरकारने कोरोनावरील लशीची घोषणा केली आहे. लस आणि खोट्या आश्वासनांची पूर्ती केव्हा होणार हे पाहण्यासाठी तुमच्या राज्यातील निवडणुका केव्हा आहेत याकडे सर्वांनी लक्ष द्या, असं ट्वीट करत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

दरम्यान, दिवसेंदिवस देशातील कोरोनाचं संकट वाढतंच चाललं आहे. मात्र, कोरोनावरील लस नेमकी केव्हा येईल याबाबत अद्यापकोणतीही खात्री नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगना पुन्हा बरळली! ‘त्या’ प्रकरणी महाराष्ट्र सरकारवर अप्रत्यक्षपणे आरोप करत म्हणाली…

चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या गायकाचं नि.धन, मोदींनीही शोक व्यक्त केला

मिर्झापूरचा दुसरा सिझन सापडला वादात; ‘या’ कारणामुळे बंदी येण्याची शक्यता!

एकनाथ खडसे यांचा धक्कादायक खुलासा! चंद्रकांत पाटलांविषयी सांगितलं ‘ते’ सत्य

काय सांगता! ‘ही’ गोष्ट न केल्यास LPG ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही