मुंबई | कोरोना (Corona) महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार माजला होता. त्यामुळे सगळंच ठप्प पडलं होतं. त्यावेळी सर्वात आधी दारूची दुकानं (Liquor store) उघडण्यात आली होती.
दारूची दुकानं उघडल्यानंतर अनेक ठिकाणी लांबच्या लांब रांगा लागल्याचं पहायला मिळालं होतं. तळीरामांचे त्यावेळी चांगलेच वांदे झाल्याचं दिसून आलं होतं.
अशातच राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी आयात केलेल्या स्काॅच व्हिस्कीवरील (Scotch whiskey) किंमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर आता मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारे साधारणपणे दर आर्थिक वर्षात उत्पादन शुल्क धोरणात बदल करतात. यावेळी मध्य प्रदेशातील लोकांसाठी उत्पादन शुल्क धोरणात मोठे बदल केले आहेत. त्यामुळे आता मध्य प्रदेशात दारू स्वस्त होणार आहे.
इंग्रजी मद्याच्या किरकोळ किंमती 20 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. इंदौर, भोपाळ, जबलपूर आणि ग्वाल्हेरच्या सुपर मार्केटमध्ये दारूच्या किरकोळ विक्रीला मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारने घरबसल्या बार उघडण्यासही परवानगी दिली आहे.
त्याचबरोबर लोकांनी घरात दारू ठेवण्याची मर्यादाही सरकारने वाढवली आहे. सध्या राज्यात बिअरचे 1 बॉक्स आणि दारूच्या 6 बाटल्या घरी ठेवण्याची परवानगी आहे. चारपटीने मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत.
नवीन धोरणात सरकारने द्राक्षांव्यतिरिक्त जांभूळापासून वाईन बनवण्यास मान्यता दिली आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी द्राक्षापासून बनवलेली वाईनही शुल्कमुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता मद्यप्रेमी आनंदात असल्याचं दिसतंय.
महत्त्वाच्या बातम्या –
टाटा आणि मारुतीच्या CNG गाड्यांमध्ये काँटे की टक्कर, ‘ही’ देते जबरदस्त मायलेज
बापरे बाप ‘डोक्याला’ ताप! Omicronची ‘ही’ लक्षणे महिनाभर दिसतात; वेळीच घ्या काळजी
उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, आता…
‘…अशा नामर्द माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे’; चित्रा वाघ संतापल्या
संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून मारहाण, पाहा व्हिडीओ