मुंबई | कोरोना (Corona) महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार माजला होता. त्यामुळे सगळंच ठप्प पडलं होतं. त्यावेळी सर्वात आधी दारूची दुकानं (Liquor store) उघडण्यात आली होती.
दारूची दुकानं उघडल्यानंतर दारूच्या दुकानांसमोर मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी दारूच्या किंमती गगनाला भिडल्याचं पहायला मिळालं होतं. तरीही लोक दारूच्या एका बाटलीसाठी तासंतास रांगेत उभे होते.
अशातच आता तळीरामांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात आता लवकर दारू स्वस्त होण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने आता राज्यात दारू स्वस्त होणार आहे.
राज्य सरकारने आयात केलेल्या स्काॅच व्हिस्कीवरील (Scotch whiskey) किंमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दारूची किंमत आता इतर राज्यांच्या किंमतींऐवढी झाल्याचं दिसतंय.
स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन खर्च 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संदर्भात अधिसुचना गुरूवारी जारी करण्यात आली आहे.
राज्यात दारूची किंमत जास्त असल्याने इतर राज्यातून दारू तस्करी होत असल्याचा प्रकार वारंवार समोर येत होता. अशा प्रकारांना आता आळा बसण्याची शक्यता आहे.
राज्यात आयात करण्यात येणाऱ्या स्काॅचच्या विक्रीतून राज्य सरकारला दरवर्षी 100 कोटी रूपयांचा महसूल (Revenue) मिळतो. त्यामुळे आता येत्या काळात राज्याच्या महसूलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
व्हिस्कीच्या किंमतीत घट झाल्याने आता राज्यात व्हिस्कीचा व्यापार वाढण्याची शक्यता आहे. तब्बल अडीचशे पटीने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्य सरकारला दारूपासून सर्वाधिक महसूल मिळतो. कोरोनामुळे राज्याचा महसुल 27 टक्क्यांवर आल्याचं ठाकरे सरकारने सांगितलं होतं. त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर वाद देखील होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी सात्त्याने होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खट्टी मीठी यारी! तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांचा एकाच सोफ्यावर बसून हास्यकल्लोळ
“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला”
घोटाळ्यांवरुन गदारोळ सुरु असताना आणखी एका 100 कोटींच्या घोटाळ्याचा दावा
समीर वानखेडेंची बाजू भक्कम, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा दाखला
‘…आता हे सहन होत नाही’; अमृता फडणवीसांचं नवं गाणं सोशल मीडियावर ट्रोल