मुंबई | परदेशी भूमीवर गेल्यावर आपला देश आणि इथल्या मातीविषयीची ओढ मनात आठवणींचं काहूर माजवते. हिच भावना सिनेरसिकांना ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या आगामी मराठी चित्रपटातील एका गाण्यात अनुभवायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वीच मुहूर्त झालेल्या ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटातील महत्त्वाचं गाणं नुकतंच रेकॅार्ड करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी हे गीत गायलं आहे.
अंधेरी येथील पंचम स्टुडिओमध्ये या चित्रपटातील ‘ज्या मातीवर जन्म आपला, तोच आपला देश…’ हे गाणं ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. हे गाणं गीतकार श्रीकृष्ण राऊत यांच्या लेखणीतून आकाराला आलं असून, संगीतकार दिनेश अर्जुना यांनी संगीतबद्ध केलं आहे.
गीतकारांनी लिहिलेली शब्दरचना मनाला भिडणारी आहे. ‘ज्या मातीवर जन्म आपला, तोच आपला देश…’ हे शब्दच मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यापुढील ‘नकोस विसरू परदेशी तू कधी आपला देश…’ हे शब्द भारतापासून दूर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना आपल्या मातीची आठवण करून देणारे आहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्यात.
मनातील भावना अचूक शब्दांच्या सहाय्यानं या गीतात मांडण्यात आल्या असून, संगीतकार दिनेशजी यांनी त्याला सुरेल संगीताचा साज चढवल्यानं हे प्रेरणादायी गीत मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्ज्वलीत करणारं ठरेल यात शंका नाही, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, गणेशोत्सव काळातही अमृता यांनी एक गाणं चाहत्याच्या भेटीसाठी आणलं होतं. गणेश वंदना असं या गाण्याचं नाव होतं. तर, या गाण्यातून एक सामाजिक संदेशही देण्यात आला होता.
भक्तीचे दुसरे नाव सेवा, असा सकारात्मक संदेश गाण्यातून देण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांनी कुटुंबातील प्रमुख स्त्रीची भूमिका साकारली होती. त्यामुळं आता या नवीन गाण्यातून अमृता फडणवीस कोणता सामाजिक संदेश देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; केंद्र सरकारचं मोठं वक्तव्य
9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांना, लाखाचे झाले असते 72 लाख
मोदींची स्तुती करणं विद्यार्थ्यांला पडलं महागात; विद्यापीठाने केलं असं काही की…
पोस्टाची बंपर योजना; लेकीच्या 18 व्या वर्षी मिळतील ‘इतके’ लाख
झेब्र्याला राग आला अन् थेट जंगलाच्या राज्यासोबतच भिडला, घडवली चांगली अद्दल, पाहा व्हिडीओ