मुंबई | दिवाळी सण आपल्याकडं मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असते. परिणामी सोने आणि चांदी खरेदीकडं नागारिकांचा कल असल्याचं पहायला मिळतंय.
अशातच सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये घट झाल्याचं पहायला मिळालं आहे. दिवाळी सारख्या मोठ्या सणाच्या पूर्वी भाव घसरल्यानं नागरिकांचा ओढा वाढणार असल्याचं दिसतंय.
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर घसरले आहेत. प्रतितोळा 0.93 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. बुधवारी सोन्याच्या दरात 448 रूपयांची घसरण झाली आहे.
दिवाळीच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव 47 हजार 513 रूपयांवर आले आहेत. चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. 0.04 टक्क्यांनी उतरले आहेत. परिणामी नागरिकांचा कल खरेदीकडं वळताना पहायला मिळत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण पहायला मिळत आहे. परिणामी विविध ठिकाणच्या सराफा दुकानांमध्ये गर्दी पहायला मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात दिवसेंदिवस घट होताना पहायला मिळत आहे. ऐनदिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या दरानं मोठी झेप घेतली होती. गेल्या वर्षी दिवाळीत सोन्याचा भाव 50,625 रुपये प्रति ग्रॅम होता, आज सोन्याचा भाव 47,513आहे. अशा परिस्थितीत आज सोन्याचे दर गेल्यावर्षीच्या दरापेक्षा 3000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
गुरुवारी दिवाळी आहे. या काळात सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी शुभ मानली जाते. या काळात बहुतेक भारतीय सोन्याची खरेदी करतात. अशा परिस्थितीत तुम्हालाही सोने खरेदी करायचे असेल, तर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये होत असलेल्या सातत्यपूर्ण घसरणीचा थेट संबंध अतरराष्ट्रीय बाजाराशी असल्याचं मत तज्ज्ञानी व्यक्त केलं आहे. परिणामी सध्या सोन्याची खरेदी करणं तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
दरम्यान, सोन्याच्या दरातील घसरणीमुळं गतवर्षीपासून सराफा बाजाराच्या लांब असणारे ग्राहक आता बाजारात येताना पहायला मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“…पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर एक शब्द देखील काढला नाही”
पराभवानंतर सुभाष साबने यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
’25 वर्ष आम्ही नको ती अंडी उबवली’; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर निलेश राणे म्हणतात…
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने दिली पुन्हा एकदा दिवाळीची भेट
“शिवसेनेच्या कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा, आम्हाला दु:ख वाटण्याचं कारण नाही”