ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीचे भाव पुन्हा उतरले

नवी दिल्ली | अनेकांना सोन्याचे दागिने घालण्याची हौस असते. कोणताही सन म्हटलं की सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पहायला मिळते. भारतात सोन्याची वाढती मागणी पाहता गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भा.व देखील गगनाला भिडले आहेत.

मात्र, आज सकाळी एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीत शुल्लक घट पहायला मिळाली आहे. आज सकाळी सोन्याचे दर 93 रुपयांनी घसरुन 49 हजार 355 रुपये प्रती तोळ्यावर उघडले आहेत. गुरुवारी हेच दर 49 हजार 448 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाले होते.

सोन्याप्रमाणे चांदीच्या दरात देखील आज घट पहायला मिळाली आहे.  आज सकाळी चांदीचे दर 300 रुपयांनी घसरून 67 हजार रुपये प्रती किलोवर उघडले आहेत. गुरुवारी चांदीचे दर 67 हजार 300 रुपये प्रती किलोवर बंद झाले होते.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे, मात्र ‘या’ कारणामुळे होणार कारवाई?

पुण्यातील या हॉटेलची संपूर्ण देशात चर्चा; थाळी संपवली तर देत आहेत बुलेट गिफ्ट!

शरद पवारांनी आपलं वजन वापरलं, भारतीय खेळाडूंना होणार ‘हा’ मोठा फायदा!

से.क्स रॅकेटवर पोलिसांचा छा.पा, चक्क ‘ही’ अभिनेत्रीच तेथे आढळल्याने उडाली मोठी खळबळ

रहाणेचं नाव ‘अजिंक्य’ कसं पडलं?; वडिलांनी सांगितला गमतीदार किस्सा