महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी; सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

नवी दिल्ली | मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात सूट दिलीये.

इम्पोर्ट ड्यूटी आणि सेस अर्थात उपकरातील या कपातीमुळे ग्राहकांना खाद्यतेल स्वस्त दरात उपलब्ध होईल. गेल्या दोन वर्षात खाद्यतेलाच्या किमती दुपटीने वाढल्या. आता सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सरकारने सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमती कमी करण्यासाठी दोन्ही तेलाच्या आयातीवरील आयात शुल्क दोन वर्षांसाठी पूर्णपणे रद्द केलं आहे.

याशिवाय कृषी विकास म्हणून आकारण्यात येणारा 5 टक्के सेस अर्थात उपकरही काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होतील आणि त्याचा थेट फायदा किरकोळ बाजारातील ग्राहकांना होईल.

दरम्यान, याआधी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती. आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच…”; ज्ञानवापी प्रकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य 

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पुढील 4 दिवस पाऊस झोडपून काढणार 

“बारामतीचा गडी एवढा हुशार कसा?, मला वाटतं की हा ब्रह्मदेवाला चुकवून…” 

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली!