JIO च्या ग्राहकांसाठी खुशखबर! कंपनीने केली ‘सर्वात स्वस्त प्लॅन’ची घोषणा

मुंबई | काही वर्षांपूर्वी जिओने (JIO Recharge Plan) टेलिकाॅम क्षेत्रात एन्ट्री मारत प्रतिस्पर्धी कंपन्यांना मोठा धक्का दिला. सर्वात आधी 4 जी कनेक्टीविटीसह फुकत नेट देत टेलिकाॅम क्षेत्रात मोठी क्रांतीच घडवली.

मागील काही दिवसांपासून एअरटेल आणि वोडा आयडीया जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांनी आपापल्या प्लॅन्समध्ये अमुलाग्र बदल देखील केले.

जिओने देखील मोठे बदल करत आपली आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता जिओने सर्वात स्वस्त प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे.

जिओ आपल्या ग्राहकांसाठी टॉप-अप व्हाउचर ऑफर घेऊन येत असतो. 10 रूपयांपासून ते 1000 पर्यंत जिओचे प्लॅन्स आहेत. अशातच आता जिओ ग्राहकांसाठी जिओने भन्नाट योजना आखली आहे.

जिओच्या 10 रूपयांच्या टॉप-अप व्हाउचरमध्ये आता अनलिमिटेड वॅलिडिटीसह 7.47 रूपयांचा टाॅक टाईम मिळणार आहे. याचा वापर आता कॉलिंग, डेटा आणि एसएमएससाठी देखील करता येणार आहे.

याहून विशेष गोष्ट म्हणजे फक्त 10 च्या रिचार्जमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल काॅल देखील करता येणार आहे. जिओचा सर्वात महागडा टाॅक अप प्लॅन हा 844 रूपयांचा आहे. त्याला देखील मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

दरम्यान,जिओच्या या प्लॅनचा खूप मोठ्या ग्राहकांना फायदा होणार असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता ग्राहक देखील या प्लॅनचा आनंद घेताना दिसतील.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अनिल देशमुख मंत्रिमंडळात परत येतील, शरद पवार त्यांना…”

“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं” 

“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर” 

“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं” 

‘त्या डायरीतील भाजप नेत्यांची नावं जाहीर करा’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य