मुंबई | ‘सपनो का शहर’ म्हणुन ओळख असलेल्या मुंबईत आपलं स्वत:चं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. पण मुंबईत दहा बाय दहाच्या खोलीसाठीही भलीमोठी रक्कम मोजावी लागते.
मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना राज्य सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
500 चौरस फूट घरे असलेल्या नागरिकांना मालमत्ता करात माफी मिळणार आहे. या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा मालमत्ता कर भरण्याची गरज लागणार नाही.
मालमत्ता करात माफी देण्याच्या प्रक्रियेला देखील सुरूवात झाली आहे. माहिती व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे.
‘महापालिकेवर आमची सत्ता आली की आम्ही 500 चौरस फुटांच्या घरावरील मालमत्ता कर सरसगट माफ करू’, असं शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होत.
यासंबंधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना याबद्दलचा महापालिकेचा प्रस्ताव आला असून त्याबद्दल काम सुरू असल्याची माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
आम्ही लवकरच याबद्दल घोषणा करू. या निर्णयाबद्दल महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशिल आणि सकारात्मक आहे, असं वक्तव्य देखील एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये 500 चौरस फुटांचे जवळ जवळ 15 लाख घरे आहेत. या 15 लाख घरात 28 लाख कुटुंबीय राहतात.
राज्य सरकारकडून मालमत्ता कर सरसकट माफ करण्याची घोषणा झाली तर मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या तब्बल 28 लाख कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
अजित दादांनी दोन लगावले चार झेलले पण…- संजय राऊत
“एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या जागी स्वत:चा फोटो लावतील”
जगाचं टेन्शन वाढलं, Omicron बाबत WHO नं दिला ‘हा ‘गंभीर इशारा
काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीला झटका, केलं ‘हे’ मोठं वक्तव्य