मुंबई | मागील अनेक दिवसांपासून पोलीस भरती व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी घोषणा केली होती.
आगामी काळात 7231 पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी जाहीर केलं होतं. त्यावर अजित पवारांनी देखील एनसीसी उमेदवारांना मोठा दिलासा दिला होता.
एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये गुण देण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी मोठी घोषणा केली आहे.
ज्या तरुणांकडे NCC A सर्टिफिकेट असेल, त्याला एकूण गुणांच्या 2 टक्के अतिरिक्त गुण पोलीस भरतीसाठी मिळतील. B सर्टिफिकेट असलेल्या उमेदवारांना गुणांच्या 3 टक्के मार्क मिळतील.
तर ज्यांच्याकडे C सर्टिफिकेट असलेल्या तरुणांना एकूण गुणांच्या 5 टक्के मार्क मिळतील, अशी माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.
दरम्यान, एनसीसीमध्ये जाणारे अनेक तरूण पोलीस भरतीसाठी तयारी करत असतात. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“कोण कोणासोबत झोपतो हे…”, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली
Health Tips For Summer: कडक उन्हाळ्यात ‘हे’ 7 पदार्थ नक्की खा… शरीराला आराम मिळेल
स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या प्रदीपचं आनंद महिंद्रांनी केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले…
Knee pain: कमी वयातच गुडघे दुखतात का?, ही लक्षणं दिसताच वेळीच सावध व्हा
“भाजपला झुंडचा इतका तिरस्कार आणि द कश्मीर फाइल्सचा इतका पुळका का?”