मुंबई | दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 5 टक्यांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रूपये देण्यात येणार असल्याचं कळतंय.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी याबाबत घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभ 93 हजारांहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना होणार आहे. महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचं परब यांनी यावेळी सांगितलं आहे.
प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला होणारा पगार यावेळी 1 तारखेला म्हणजे दिवाळीआधी होणार आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या तिकिटामध्ये तब्बल 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या तिकीटवाढीमुळे आता एसटीचा प्रवास महागणार असून आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.
महत्वाच्या बातम्या-
येत्या महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का?; जयंत पाटलांच मोठं वक्तव्य म्हणाले…
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये मोठा बदल, वाचा आजचा दर
मलिकजी माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका- समीर वानखेडे
मागासवर्गीय असल्यानेच समीर वानखेडेंना टार्गेट केलं जातंय- रामदास आठवले
“बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील”