Corona लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज; ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर

मुंबई | कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे, आणि आता कोरोनाचा एक नवा ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंट याला कारणीभूत ठरतो आहे. या कोरोना व्हेरिएंटचं नाव आहे ओमिक्रॉन. या व्हेरिएंटची दहशत इतकी आहे की अनेक देशांनी आपल्या सीमा विदेशी नागरिकांसाठी बंद केल्या आहेत. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

कोरोना लस (Coronavirus Vaccine) घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. या लोकांमध्ये ‘सुपर इम्युनिटी’ आढळली आहे.

अमेरिकेमधील ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीमधील एका ग्रुपने केलेल्या संशोधनातून (Covid Vaccine Super Immunity Research) हे उघड झालं आहे. हे परिणाम पाहून शास्त्रज्ञदेखील आश्चर्यचकित झाले आहेत.

26 लोकांवर चाचणी करण्यात आली. यातून असं दिसून आलं की, लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये 2000 टक्क्यांपेक्षा जास्त अँटीबॉडीज वाढल्या आहेत.

लस घेण्यापूर्वी या लोकांना कोरोनाची लागण एकदाही झालेली नव्हती. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. या 26 रुग्णांच्या शरीरातील अँटीबॉडीजमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीमधील मॉलिक्युलर बायोलॉजीचे प्राध्यापक फिकाडू ताफेसे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोनानंतर आता देशामध्ये ओमिक्रॉनने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना काही निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना एक पत्र लिहून इशारा दिला आहे आणि महत्वाची माहीती देखील सांगितली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ओमिक्रॉन डेल्टापेक्षा तीनपट जास्त संसर्गजन्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर ते 4 दिवसांत राज्य विकून मोकळे होतील” 

विरोधकांच्या राड्यानंतर भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहाची माफी, म्हणाले… 

“मोदींच्या विचारांची उंची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये येणं कधी शक्यच नाही” 

भास्कर जाधवांनी मोदींची नक्कल केल्याने विधानसभेत राडा; देवेंद्र फडणवीस संतापले 

पेपरफुटीच्या चौकशीसाठी वेळ मागणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना नाना पटोलेंचं उत्तर, म्हणाले…