टिकटाॅक युजर्ससाठी आनंदाची बातमी, भारतात टिकटाॅकच पुन्हा कमबॅक?

जगभरात प्रसिद्ध असलेलं शार्ट व्हिडीओ अॅप म्हणजे टिकटाॅक. या अॅपनं लहान मोठ्या सर्वांना वेड लावलं होतं. यामुळे अनेकांच्या मध्ये लपलेले कलागुण समोर येत होते. एवढंच नाही तर यामधून अनेक लोक पैसेदेखील कमवत होते. मात्र गेल्यावर्षी भारतात या अॅपवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे अनेक लोकांची नाराजी झाली.

टिकटाॅकवर बंदी आल्यामुळं अनेकांचं नुकसान झालं. त्याचबरोबर कंपनीचं देखील भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे. अशातच जे टिकटॉक युजर्स आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे.

टिकटाॅकची भारतात पुन्हा एकदा वापसी होण्याची चिन्हं दिसत आहेत. टिकटॉक आता आपल्या भारतीय ऑपरेशन्सची विक्री करण्याच्या विचारात आहे. चीनच्या बाईटडन्सने टिकटॉकच्या भारतीय ऑपरेशन्सची विक्री आपला प्रतिस्पर्धी असलेल्या ग्लांसला विकण्याचा विचार करीत आहे. टिकटॉक ची मूळ मालकी बाईटडन्सची आहे.

या अॅपवर लावलेला बॅन हटवावा यासाठी कंपनी पूर्ण प्रयत्न करत आहे. बाईटडान्स त्याचा भारतीय टिकटाॅकचा बिझनेस देशी कंपनी ग्लांसला विकू शकते. रोपोसो हे त्या कंपनीचे लोकप्रिय अॅप आहे.

भारतामध्ये टिकटॉक बॅन केल्यामुळे कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कंपनी भारत सरकारसोबत बातचीत करून हे अ‍ॅप पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

केंद्र सरकारनं टिक टॉकसह 59 चायनिज अॅप जुलै 2020 मध्ये बॅन केली होती. तेव्हापासून भारतात टिक टॉकची टीम तर होती. मात्र काहीच काम करु शकत नव्हती.

दरम्यान, भारतात टिकटाॅक बॅन झाल्यानंतर या कंपनीला एका दिवसात 1 कोटी 64 लाखाचा झटका बसला होता. त्यामुळे एवढ्या नुकसानानंतर टिकटाॅक पुन्हा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे.

महत्वाच्या बातम्या –

मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे दर स्थिरावले, वाचा आजचे दर

सारखं सारखं माहेरी जाणाऱ्या पत्नीला न्या.यालयाचा द.णका, दिला मोठा निर्णय!

पॉ.र्न पाहत असाल तर वेळीच व्हा सावधान, आता अशा प्रकारे पो.लिसांना मिळणार टीप

आता ‘या’ मुलाच्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

‘राजा हिंदूस्तानी मधील तो किंसींग सीन करताना मी…’; करिश्मा कपूरने सांगितला तो किस्सा