मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. सोलापूर दक्षिण तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या गटाने पहिलं खातं उघडण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण सोलापूर तालुका युवासेना प्रमुख धर्मराज बगले यांनी चिंचपूर ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे.
भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला झटका बसला आहे. माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालासाठी मतमोजणी सुरू आहे.
राज्याच्या आज 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकलाकाकडे सर्वाचं लक्ष लागलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील 36, परभणी 2, उस्मानाबाद 9, जालना 27, लातूर 6,अहमदनगर 13, पुणे 17, सोलापूर 25, धुळे 41, जळगाव 20, सातारा 7, सांगली 1, औरंगाबाद 16, बीड 13 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 5 अशा एकूण 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे.
राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर राज्यातील निवडणुकीकडे सर्वाचं लक्ष होतं. अन् अश्यात सोलापुरात शिवसेनेचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?’, अमृता फडणवीस म्हणतात…
‘गुजरात दंगलीतून नरेंद मोदींना…’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
“अखेर नड्डा देखील सब घोडे बारा टक्के निघाले”
भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारखे रस्ते होणार- नितीन गडकरी