Good News: कॉमेडी क्वीन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

मुंबई | तमाम जनतेला आपल्या विनोदी शैलीनं खळखळून हसवणाऱ्या कॉमेडी क्वीन भारती सिंहने (Bharti Singh) चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

भारतीला पुत्ररत्न झालं आहे. ही आनंदाची बातमी भारतीच्या पतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

भारतीचा पती हर्ष लिंबाचियानं ही आनंदाची बातमी शेअर केली असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे.

भारतीला मुलगा झाला असून रविवारी तिची प्रसूती झाली. भारतीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झालं असून सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव पहायला मिळत आहे.

कॉमेडियन भारती सिंह सध्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. तिच्या चाहत्यांनाही मुलगा होणार की मुलगी याची प्रतिक्षा लागून होती.

‘बाळ कसं असेल सांगता येत नाही, पण ते नक्कीचं विनोदी असेल… कारण बाळाचे आई-वडील दोघे विनोदी आहेत…’, असं भारतीनं काही दिवसांपू्र्वी म्हटलं होतं.

हर्षसोबत भारतीचे फोटो तुफान व्हायरल झाले. चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता ते बाळाचा फोटो कधी समोर आणतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

भारती हुनरबाज शोसाठी एन्करींग करत होती. आई झाल्यामुळे भारतीला लगेच काही कामावर जाता यायचं नाही. त्यामुळे आगामी शोमध्ये तिची जागा कोण घेणार, हेही पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  “देवेंद्रजी, तुम्ही थोडं अडजेस्ट केलं तर….”; काॅंग्रेसचा घणाघात

  “पहिल्यांदा तुमचा मुलगा अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा”

  Corona Update: ‘या’ ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ

  “राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले”

  “राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मी 200 टक्के सहमत”