काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; 3 बड्या नेत्यांचा पक्षाला रामराम

नवी दिल्ली | काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उत्तराखंड काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तराखंड प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र प्रसाद रातुडी, राज्य महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष कमलेश रमण आणि सोशल मीडिया सल्लागार कुलदीप चौधरी यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. हा काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

प्रदेश प्रवक्ते राहिलेले आर पी रातुडी आणि देहरादून महिला काँग्रेसचे महानगर अध्यक्ष कमलेश रमण यांनी पक्षाला रामराम करत आपमध्ये प्रवेश केला.

2017 आणि 2022 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठ्या फरकाने पराभव झाला. पक्ष बळकट करण्याची गरज होती मात्र आता परिस्थिती टोकाला पोहोचली आहे.

आर.पी. रातुडी आणि कमलेश रमण हे प्रदीर्घ काळ खरे सैनिक म्हणून काँग्रेसमध्ये होते. आता अचानक नाराज होऊन त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.

 महत्त्वाच्या बातम्या- 

“मंत्री-संत्री व्हा पण सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे, करेक्ट कार्यक्रम करणार” 

‘उद्धव ठाकरेंना दुखावणं म्हणजे बाळासाहेबांना दुखावण्यासारखं’ -सुप्रिया सुळे 

‘या’ कारणामुळे सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

देवेंद्र फडणवीसांना टॅग करत संजय राऊतांचं सूचक ट्विट, म्हणाले…

राज ठाकरेंचं मनसे पदाधिकाऱ्यांना पत्र, दिल्या महत्त्वाच्या सूचना