काँग्रेसला ‘जोर का झटका’…; माजी मुख्यमंत्र्यांसह ‘इतक्या’ आमदारांचा पक्षाला रामराम

शिलाँग | तृणमूल काँग्रेसने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. TMC ने मेघालयमध्ये माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह 12 आमदारांचा पक्षात समावेश केला आहे.

मेघालयमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला मोठा झटका दिलाय. विधानसभेची निवडणूक न लढता मेघालय मध्ये तृणमूल काँग्रेस बनला विरोधी पक्ष बनला आहे.

आज दुपारी तृणमूल प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या मुकुल संगमा यांच्यासह आमदारांच्या आमदारकीला कोणताही धोका नसणार आहे.

मेघालयमधील विधानसभेची एकूण सदस्य संख्या 60 आहे. इथं भाजपच्या समर्थनातील एनडीएटे 40 आमदार आहेत. तर, काँग्रेसचे 18 आमदार होते. त्यापैकी 12 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

दोन तृतियांश आमदारांनी पक्षांतर केल्यानं काँग्रेसला बंडखोरी करत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांवर पक्षातंर बंदी कायद्याअतंर्गत कारवाई करता येणार नाही. यामुळं मेघालयात आता काँग्रेसच्या जागी तृणमूल काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करेल.

मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा हे गेल्या अनेक दिवसांपासून पार्टी हायकमांडवर नाराज होते. हायकमांडने त्यांच्याशी चर्चा न करता व्हिन्सेंट एच. पाला यांना मेघालय प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवे प्रमुख बनवल्याने त्यांची नाराजी होती.

दरम्यान, राहुल गांधी यांनी ऑक्टोबरमध्ये मुकुल आणि व्हिन्सेंट एच पाला यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता हा वाद मिटला असल्याचं बोललं जात होतं.

आता महिनाभरानंतर मुकुल यांच्यासह 12 आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

TMC सध्या देशभरात पक्षाचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुइझन फ्ल्युरिओ यांचा पक्षात समावेश केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

“महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय” 

‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी येण्याची दाट शक्यता- राजेश टोपे 

एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ; अनिल परबांची मोठी घोषणा 

एकनाथ शिंदे की अजित पवार?, महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार???