शेअर बाजारात येताच मालामाल; ‘नायका’च्या फाल्गुनी नायर यांचा अनोखा पराक्रम

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेकजण पैसे कमवण्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करतात आणि बक्कळ पैसा देखील कमवतात.

अशातच आता नायका कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांचं नाव आज चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या कंपनीला शेअर बाजारात उतवताच फाल्गुनी नायर यांनी मोठ्या यशाला गवसणी घातली आहे.

फाल्गुनी नायर भारतातील ‘स्वतंत्र पहिल्या महिला श्रीमंत उद्योजका’ ठरल्या आहेत. ब्लुमबर्ग बिलेनिर्यस इंडेक्सने याबाबत महिती दिली आहे. नुकताच त्यांनी नायका कंपनीचा आयपीओ बाजारात उतरवला होता.

नायकाच्या समभागांनी बुधवारी शेअर बाजारामध्ये जोरदार पदार्पण केलं. शेअरने एनएससीवर प्रति शेअर 2,054 रूपयेवर 82 टक्केपेक्षा जास्त प्रीमियमने व्यापार सुरू केला, त्याच्या आयपीओ इश्यू किंमतीच्या 1,125 रूपये प्रति शेअरच्या तुलनेत वाढलेली होती.

सुरुवातीच्या सौद्यांमध्ये त्याचे बाजार भांडवल 1 लाख कोटी रूपये पार केलं आहे. तर दुसरीकडे सेनसेक्सवर पहिल्या दिवशी शेअर 10 टकक्यांपेक्षा जास्त 2,208 रूपयांवर बंद झाल्याचं पहायला मिळालं.

फाल्गुनी नायर यांनी कंपनी नायका वर्टिकल अंतर्गत सौंदर्य प्रसाधनाचा व्यवसाय चालवतात, जिथं नायका फॅशन वर्टिकल अंतर्गत पोशाख आणि उपकरणांचा व्यवसाय देखील चालतो.

फाल्गुनी नायर एक ऑफलाइन चॅनेल देखील चालवतात, ज्यामध्ये भारतातील 40 शहरांमधील 80 स्टोअर्सचा समावेश आहे, ज्यामध्ये ऑगस्ट 2021 पर्यंत तीन वेगवेगळ्या स्टोअर फॉरमॅट आहेत.

भारतीय सौंदर्य प्रसाधने बाजार 2020 मध्ये 1.1 लाख कोटी रुपयांवरून 2025 पर्यंत अंदाजे 2 लाख कोटी रुपयांनी वाढण्याचा अंदाज आहे.

भारतीय फॅशन बाजार 3.8 वरून 2025 पर्यत अंदाजे 8.7 लाख कोटी रुपयांपर्यत वाढण्याची अपेक्षा आहे. फाल्गुनी नायर यांच्या नेतृत्वाखालील भारतातील पहिले युनिकॉर्न स्टार्टअप 2012 मध्ये स्थापन केलं होतं.

मोबाइल अॅप आणि वेबसाइटद्वारे सौंदर्य प्रसाधने उत्पादने विकली होती. आठ वर्षांनंतर, 58 वर्षांच्या नायर केवळ सहा इतर भारतीय महिला अब्जाधीशांमध्ये सामील झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यभर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; ‘या’ 11 जिल्ह्यांना अलर्ट जारी

“…तोपर्यंत मुंबई सोडायची नाही, बायकापोरांसह सगळे मुंबईत या”

“डुकराशी कुस्ती कधीच खेळू नये हे मी आधीच शिकलोय”

 एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…