“पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका, हे मी आधीपासून सांगत होतो”

मुंबई | ST कामगाराचं शासनात विलिनीतरण शक्य नाही, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी(Ajit Pawar) विधानसभेत बोलताना दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाचा मुद्दा हायकोर्टात आहे. हायकोर्टाच्या निर्देशावरुन विलिनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन झालेली आहे. त्या समितीने आपला अभ्यास सुरु केलेला आहे, त्या समितीने अभ्यासासाठी मुदत वाढ मागितल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल पण एसटी कामगार-कर्मचाऱ्याचं शासनात विलिनीकरण शक्य नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका, हे मी आधीपासूनच सांगत होते. मान्यता प्राप्त युनियन पवारांच्या आहेत, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयातून यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला. अजित पवार यांना विलीनीकरण शक्य नाही, असं माहीत होतं, तरीदेखील राष्ट्रवादीने आपल्या जाहीर नाम्यात का उल्लेख केला?, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

आम्ही आंदोलन करता होतो तेव्हा शिवसेना राष्ट्रवादीवाले म्हणत होते आम्ही कर्मचाऱ्यांना भडकवत आहोत. आम्ही विरोधाला विरोध करणारे नाहीत. आज अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचे संसार उघड्यावर आले. हे सर्व सरकारचे अपयश आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीकाही पडळकरांनी केलीये.

गेली 50 वर्ष हे कर्मचारी तुमच्यावर विश्वास ठेवून आहेत. ज्यांच्या पाठीमागे कर्मचारी राहिले, त्यांनीच आज कर्मचाऱ्यांचा घात केला, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केलीये.

दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानासह राज्यभरात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Srike) सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी ठाण मांडून आहेत. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाचा मुद्दा त्यांनी लावून धरत आक्रमक पवित्रा घेतला आहेत.

महत्वाच्या बातम्या –

भारतातील Omicron बाधितांचा धक्कादायक रिपोर्ट समोर, ‘कोरोना लस घेतलेल्यांनाच…’ 

“अभिनेत्यानं माझं चुंबन घेतलं अन् माझ्या स्तनांना…”, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 

 दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…

‘…म्हणून धोनीला मेन्टाॅर केलं’; कोहली-बीसीसीआय वादानंतर नवा खुलासा

 रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा