मुंबई | धनगर समाजाला बिरोबाची शपथ देऊन भाजपला आता यापुढच्या काळात मतदान करायचं नाही, असे सांगणारे नेते गोपीचंद पडळकर हे आता भाजपकडूनच विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यावेळीही आणि आता आमदार झाल्यावर आताही विरोधी पक्ष त्यांना त्याच शपथेची आठवण करून देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडत आहे. त्यांच्या या टीकेला पडळकर यांनी आज उत्तर दिलं.
मी धनगर समाजाला बिरोबाची शपथ दिली तर मग मी, आमचा समाज अन् बिरोबा आम्ही आमचं बघून घेऊ ना… पवारांच्या बगलबच्च्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही. आरक्षण लढ्यावेळी मी ती शपथ दिली होती मात्र त्यानंतर आमची बैठक झाली. तत्कालिन सरकारने समाजासाठी काही निधी घोषित केला. त्यामुळे विरोधी पक्षाला फक्त पडळकरवर टीका करायची आहे, असं ते म्हणाले.
काटेवाडीत बिरोबाचं मंदिर आहे. 67 वर्षात पवार तिथे गेले नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला सांगायची गरज नाही की मी समाजाला काय शपथ दिली होती. तुमच्या पक्षामध्ये वंचितांना न्याय देण्याची भूमिका नाही. भाजपने मला आमदारकी दिली तर तुमच्या पोटात का दुखतंय… मी काय पाकिस्तानातून आलोय का…? पक्षाचं मी 10 वर्ष काम केलंय, असं पडळकर म्हणाले.
दरम्यान, भाजपने विधानपरिषदेची आमदारकी दिली त्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे तसंच भाजपचे आभार मानले. इथून पुढच्या काळामध्ये वंचित शोषित पिडितांसाठी मी माझ्या आमदारकीचा वापर करेन, अशी त्यांनी ग्वाही दिली.
महत्वाच्या बातम्या-
-…पण तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात- बाळासाहेब थोरात
-मला काश्मीरच्या संघाचा कर्णधार व्हायचंय- शाहिद आफ्रिदी
-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; रेड झोनच्या बाहेर लॉकडाउन शिथिल
-तुम्ही कोणत्या झोनमध्ये? महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद; जाणून घ्या