अहमदनगर | महाराष्ट्रात राजकीय वातावरण नेहमीच तापलेलं पहायला मिळतं. अशातच आज अहिल्यादेवी होळकरच्या जयंतीनिमित्तानं अहमदनगरमधील चौंडीत हायव्होल्टेड ड्राम झाला.
अहिल्यादेवी जयंतीनिमित्ता चौडीत कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात आमदार रोहित पवार आणि शरद पवारही उपस्थित होते.
या कार्यक्रमाकडे निघालेल्या आमदार गोपीनाथ पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी आडवला. यावरुन जोरदार राडा झाला असून पवारांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.
बहुजनांची पोरं आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, असा खोचक टोला पडळकरांनी लगावला आहे.
शरद पवार आणि त्यांचा नातू रोहित पवार या दोघांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडीमध्ये गलिच्छ राजकारण केलं, त्याबद्दल मी प्रथम त्यांचा निषेध व्यक्त करतो, असंही पडळकर म्हणाले.
चौडीत प्रवेश करण्यापासून गोपीनाथ पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी रोखल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पहायला मिळालं.
आज नातवाला लॉन्च करण्यासाठी आमच्या प्रेरणास्थळाचा वापर कसा काय करता, असा घणाघातही पडळकरांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काॅंग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल ‘या’ पक्षात करणार प्रवेश!
मोठी बातमी ! राज ठाकरे रुग्णालयात दाखल
“उद्धव ठाकरेच 25 वर्षे मुख्यमंत्री राहतील”; सुप्रिया सुळेंना राऊतांचं प्रत्युत्तर
काॅंग्रेसमध्ये राज्यसभा उमेदवारीवरुन नाराजी, महासचिवांचा राजीनामा