“त्या तीन पक्षांची स्थिती म्हणजे म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा”

सांगली | शिवसेना (Shivsena) विरूद्ध भाजप (BJP) अधिक शिंदे गट हा वाद जगजाहीर आहेत. त्यांचे वाद सुरुवातीला शब्दांचे होते. परंतु आता ते कायदेशीर झाले असून देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

शिवसेनेत बंड झाल्यापासून आणि महाविकास आघाडी सरकार (MVA) पडल्यापासून त्यांनी डिवचण्याची आणि चिडविण्याची एकही संधी भाजप (BJP)आणि त्यांचे नेते सोडत नाहीत.

नारायण राणे (Narayan Rane), राणे बंधु आणि गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला चिडविण्याचा आणि डिवचण्याचा विडाच जणू उचलला असल्यासारखे ते त्यांच्या मागे हात धुवून लागले आहेत.

म्हसोबाला नाही बायको आणि सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीतील तीन पक्षांची परिस्थिती झाली आहे, असे म्हणत भाजपचे विधान परिषद आमदार आणि नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मविआवर निशाणा साधला आहे.

पडळकरांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिवसंवाद दौऱ्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हल्ल्यावर निषेध व्यक्त केला आहे.

आटपाडी (Atpadi) येथे खाजगी सावकारीविरोधात गोपिचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आटपाडी पोलीस स्थानकासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यांनी खाजगी सावकारी करणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे काही झंंझावती दौरा नाही. त्यांच्या दौऱ्याला तिनही पक्षांचे लोक असतात. त्यामुळे हे एकमेकाला मिळालेले आहेत. पुण्यात सामंतांवर हल्ला करणारे राष्ट्रवादीचे (NCP) लोक होते, असे त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंचा दौरा म्हणजे राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (INC) पक्षाने पुरस्कृत केलेला दौरा आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात तीनही पक्षाचे लोक असतात. आणि हे तिनही पक्ष सध्या एकमेकाच्या सोबत आहेत, असे पडळकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी उद्यावर, जाणून घ्या आज न्यायालयात काय घडले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आमटेंची भेट, पाहा फोटो

‘भाऊ पंतप्रधान तर मी उपाशी मरायचं का?’, पंतप्रधान मोदींच्या भावाचेच मोदी सरकारविरोधात आंदोलन

उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला, नवा वाद पेटणार?

हल्ल्यानंतर उदय सामंत आक्रमक, ट्विट करत म्हणाले….