“जनाब संजय राऊत…तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच”

मुंबई | केंद्र सरकारने अनेकांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यावरून शिवसेनेचं (shivsena) मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून शिवसेना नेता संजय राऊतांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

केंद्र सरकार काही लोकांना वाय सुरक्षा देऊन देशात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे एक राजकीय तसेच राष्ट्रीय धोरणच दिसते. वाय सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्राला विशेष सुरक्षा दलाची निर्मिती करावी लागेल असंच दिसतं, अशी टीका राऊतांनी केलीये.

संजय राऊतांनी केलेल्या टीकेला आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊतांना आव्हान दिलं आहे.

जनाब संजय राऊत हे वाय सुरक्षेवर लिहित आहेत. त्यांनी हिंमत असेल तर महाराष्ट्रात फिरून दाखवावं, असं आव्हान पडळकरांनी राऊतांना दिलं आहे.

जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता पण माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरवून दाखवा. म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल, अशी टीका पडळकरांनी केलीये.

जनाब राऊत अजूनही ऊर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय. यावर कधीतरी एखादा लेख लिहा, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही”

“राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजे” 

पेट्रोल डिझेलनंतर गॅस दरवाढीचा भडका; आता सिलेंडरसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये 

संस्कार, संस्कृती, सन्मान…; 125 वर्षीय स्वामी शिवानंदांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदीही नतमस्तक 

‘वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर…’; संजय राऊतांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर