Top news महाराष्ट्र मुंबई

“पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा तुमची अवस्था श्रीलंकेसारखी होईल”

padalkar sharad pawar e1637241685147
Photo Credit- Facebook/ @GopichandMLC & Devendra Fadnavis

मुंबई | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. जर महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल, असा घणाघात गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केला आहे.

तुमच्याबद्दलची सगळी माहिती महाराष्ट्राला झाली आहे. पूर्वी लोक तुमच्या विरोधात बोलत नव्हते. श्रीलंकेतील घराणेशाहीला कंटाळून लोकांनी जसा उद्रेक केला तसे पवारांच्या घराणेशाहीच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतील, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकरांनी यावेळी बोलताना ओबीसी आरक्षणावरूनही पवारांवर गंभीर आरोप केला आहे. आपल्या जवळच्या प्रस्थापितांना सत्तेत वाटा मिळावा यासाठीच पवारांची धडपड सुरु असून त्यांना ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाही, असं पडळकर म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर ओबीसी, मराठा यांच्या आरक्षणाविषयी काही देणं घेणं नाही असं म्हणत पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.

दरम्यान, काँग्रेस ही फक्त वसुली करण्यात मशगुल आहेत. इकडे ओबीसी आरक्षण गेले असताना तिकडे त्याचे मंत्री फॉरेनला गेले आहेत. काँग्रेसची अवस्था ना घर का ना घट का अशी झालीये, असंही पडळकर म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“इकडे मशिदी खोदण्यापेक्षा, चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर मिळवून दाखवा” 

“कुठेही दगड ठेवा अन् त्याला लाल रंग लावा, लगेच मंदिर तयार होतं” 

“निवडून यायचं एकाच्या जीवावर अन् चाकरी दुसऱ्यांची करायची” 

 गुजरातमध्ये काँग्रेसला जोर का झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

 सहाव्या राज्यसभा जागेवरून संजय राऊतांचा इशारा, म्हणाले…