गोपीचंद पडळकरांची भाजपमध्ये घरवापसी???

सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजपकडून धक्के मिळत असतानाच आता वंचित बहुजन आघाडीलाही मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती समजली आहे.

भाजप आणि शिवसेना युतीच्या निर्णयानंतर पडळकर यांच्या भाजपप्रवेशाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती आहे. सांगलीतील जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून पडळकर भाजपच्या तिकटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

भाजपाचा गड असणाऱ्या जतमध्ये सध्या विद्यमान आमदार विलासराव जगताप यांना स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध आहे. शिवाय येथील धनगर समाजाची संख्या अधिक असल्यामुळे पडळकर यांच्या नावाचा पर्याय पुढे आला आहे.

गोपीचंद पडळकर भाजपमधील धनगर समाजाचे नेते म्हणून महत्त्वाच्या पदावर होते. मात्र काही गोष्टींवरुन बिनसल्याने पडळकरांनी पक्षाला रामराम करत राजीनामा दिला आहे. 

पडळकर लोकसभा निवडणुकीतही सांगली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी खानापूर आणि जत मतदारसंघात पडळकर यांना जास्त मतदान झालं होतं. खानापूरमध्ये पडळकर यांची मतं निर्णायक ठरणार आहेत. सध्या जत मतदारसंघात शिवसेनेचे अनिल बाबर आमदार आहेत.

महत्वाच्या बातम्या-