“शकुनी काकाच्या इशाऱ्यावर हे ठाकरे सरकार चालतंय तोपर्यंत…”

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनं ठाकरे सरकारला मोठा झटका दिलाय.

सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश देताना म्हटलंय की, 27 टक्के ओबीसी आरक्षण जागा या खुल्या प्रवर्गासाठी म्हणून नोटीफाय करा आणि ह्या 27 टक्के आणि आधीच्या 73 टक्के जागांवरचा निकालही एकाच दिवशी लावला जावा. न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरे सरकार आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

जोपर्यंत शकुनी काकाच्या इशाऱ्यावर हे प्रस्थापितांचं सरकार चालतंय तोपर्यंत हे फक्त असे दाखवण्यापुरते नाटक करून तोंडाला पानं पुसण्याचं काम करतील, असं नाव न घेता पडळकरांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.

आजच्या सर्वोच न्यायलयाच्या निर्णयामुळे प्रस्थापितांच्या संपूर्ण नौटंकीचा बहुजनांपुढे फर्दाफाश झाला आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

अध्यादेश काढण्यापूर्वी इंपेरिकल डेटा गोळ करा आणि मगच अध्यादेश काढा असे वारंवार सांगितले होते. पण प्रस्थापितांना आपल्या उमेदवारांसाठी मार्ग मोकळा करायचा होता आणि म्हणूनच त्यांनी नावापुरता अध्यादेश काढला, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

मी सर्व बहुजनांना आव्हान करतो, आपला हक्क घेतल्याशिवाय मिळाणार नाही, असं आवाहन देखील गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजाला केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! ठाकरे सरकारला एकाच दिवशी सलग दुसरा झटका 

रूपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्यानंतर वसंत मोरेंचं ट्विट, म्हणाले… 

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका 

“वसंत मोरे, संदीप देशपांडे यांच्यासोबत भावंड म्हणून काम केलं, पण…” 

…म्हणून रूपाली पाटील ठोंबरेंनी दिला राजीनामा; खरं कारण आलं समोर